मुंबई : शहरात रात्रीपासून धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. दरम्यान सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ येथे उड्डाणपुलाखाली पाणी भरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत धिम्यागतीने सुरु आहे. नेरुळ ते सानपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत, जोरदार पावसाने वाशी ,बेलापूर आणि ऐरोली भागतील बस डेपोमध्ये पाणी भरल्याने प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे.

सायन परिसरात आणि दादर येथील हिंदमाता परिसरात कमरेपर्यंत पाणी भरलं आहे. गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला कुर्ला या सारख्या सखल भागात पाणी साचलं, तर इतर ठिकाणचे रस्ते जलमय झाले आहेत. मानखुर्द, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड या सखल भागात पाणी साचले आहे. वरळी, दादर, मुलुंड, भांडुप, कांजुर, विक्रोळीत रिमझिम पाऊस पडत आहे.

मुंबई: अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत धीम्या गतीने