14 November 2019 12:00 AM
अँप डाउनलोड

शिवसेनेने मुंबईकरांना दाखवलेलं रेसकोर्सवरील थिमपार्कच स्वप्नं ठरणार मृगजळ?

मुंबई : मुंबईमध्ये कफपरेड मधील अरबी समुद्रात जवळजवळ ३०० एकर इतक्या प्रचंड जागेवर भरणा टाकून सेंट्रलपार्क उभारणारले जाणार असून, त्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपकडून मजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालिकेतील विरोधकांचा विरोध डावलून तो मंजूर करण्यात आला आहे.

परंतु शिवसेना आणि भाजपने मंजूर केलेल्या त्या प्रस्तावामुळे, शिवसेनेने मुंबईकरांना रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थिमपार्क उभारण्याचे दिलेलं आश्वासन बासनात गुंडाळण्यात आल्याची चर्चा खुद्द मुंबई महापालिकेतच सुरु झाले आहे. मुंबईच्या तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मांडलेला प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांनी सुद्धा मंजुरी दिली होती.

शिवसेनेला केंद्रात, राज्यात आणि मुंबई महापालिकेत सत्ता असून सुद्धा हा प्रस्ताव मार्गी लावता आला नाही हे विशेष. परंतु कफपरेडमधील समुद्रात सेंट्रलपार्क उभारण्याला मजुरी मिळाल्याने रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या थीमपार्क उभारण्याचे स्वप्न म्हणजे मुंबईकरांना दाखविलेले मृगजळ असल्याचे सिद्ध झालं आहे. मुंबई महापालिकेत स्थायी समितीने बुधवारी मंजूर केलेल्या प्रस्तावामुळे भविष्यातील वास्तव समोर आले आहे. एकूणच महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमताच्या जोरावर शिवसेना स्वतःच मुंबईकरांना दाखविलेल्या स्वप्नांचा चुराडा करत आहे असं एकूण चित्र आहे.

विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतील विरोधकांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या प्रतिनिधींना जेव्हा,’रेसकोर्सवरील पार्काचे काय?’ असा प्रश्न केला तेव्हा सत्ताधारी शिवसेना व भाजपच्या प्रतिनिधींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही यातूनच सर्व काही समोर येत आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(726)#udhav Thakarey(396)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या