22 October 2021 1:26 PM
अँप डाउनलोड

सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅपला फटकारले

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून चांगलेच झापले आहे. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावून सर्वोच न्यायालयाने प्रश्न विचारला आहे की, ‘अद्याप भारतात तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक का करण्यात आलेली नाही?’.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसेच सर्वोच न्यायालयाने व्हॉट्सअॅपला नोटीस बजावताना त्यात स्पष्टीकरण देण्यासाठी ४ आठवड्यांची मुदतही सुद्धा दिली आहे. तसेच व्हॉट्सअॅप बरोबरच संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व अर्थमंत्रालयालाही नोटीस धाडण्यात आली असून या नोटिशीला उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ४ आठवड्यांची मुदत दिली आहे.

मागील आठवड्यात व्हॉट्सअॅपचे सीईओ ख्रिस डॅनियल्स भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यात व्हॉट्सअॅपवरुन पसरवल्या जाणाऱ्या अफवा रोखण्यासाठी भारतात व्हॉट्सअॅपचे कार्यालय सुरु करावे, भारतात तक्रार निवारणासाठी अधिकारी नेमावेत तसेच भारतीय कायद्याचे पालन करावे या ३ मुख्य सूचना सीईओ ख्रिस डॅनियल्स यांना भारत सरकारकडून करण्यात आल्या होता.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1656)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x