29 November 2022 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Mutual Fund | LIC शेअर्सने पैसे बुडवले, पण LIC म्युच्युअल फंडाच्या या योजना 100% पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा Multibagger Stocks | पैसा कोणाला नको! हे 20 शेअर्स 530 टक्क्यांपर्यंत परतावा देतं आहेत, स्टॉक लिस्ट पहा, खरेदी करणार? Horoscope Today | 30 नोव्हेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Quick Money Share | काय सांगता! या टॉप 5 शेअर्सनी 5 दिवसात 53 पर्यंत परतावा दिला, शेअर्स नोट करा, पैसा वाढवा Gold Price Today | आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील लेटेस्ट दर तपासून घ्या SBI Recruitment 2022 | एसबीआय बँकेत (मुंबई) भरती, ऑनलाईन अर्ज करा
x

रणजी ट्रॉफी; विदर्भ सलग दुसऱ्यांदा ‘फायनल’मध्ये

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेत विदर्भ संघाने सलग दुसऱ्यांदा इंटिम फेरी गाठली आहे. जलद गोलंदाज उमेश यादवच्या तुफान गोलंदाजीच्या बळावर विदर्भ संघाने हा पराक्रम केला आहे. दरम्यान, उमेश यादव याचे बारा बळी आणि फैझ फझलच्या एकूण ७५ धावांच्या बळावर उपांत्य सामन्यात केरळवर एका डावाने विजय प्राप्त केला. तसेच उमेशने पहिल्या डावात केवळ ४८ धावांच्या मोबदल्यात तब्बल ७ फलंदाजांना तंबूत परतवले. आज पर्यंतच्या इतिहासातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील ही त्याची सर्वात उत्तम कामगिरी आहे.

दरम्यान, या सामन्यात उमेशने घेतलेल्या ७ बळींच्या जोरावर विदर्भाच्या संघाने केरळचा पहिला डाव केवळ १०६ धावांवर रोखला. त्यानंतर सलामीवीर फैज फेजलाच्या ७५ धावांच्या जोरावर विदर्भाने एकूण २०८ धावा पूर्ण केल्या. त्यानंतर सुरु झालेल्या दुसऱ्या डावात पुन्हा केरळचा संघ गडगडला. उमेश यादव आणि यश ठाकूरच्या गोलंदाजीच्या जोरावर केरळचा डाव केवळ ९१ धावांत आटोपला. तब्बल १२ फलंदाजांना तंबूत घडणाऱ्या उमेश यादवला सामन्याचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आले.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x