24 April 2024 10:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

मंदिरात आली मगर | पण नशीब शाकाहारी होती ती

Vegetarian crocodile, reaches temple, Kerala

कासरगोड, २४ ऑक्टोबर : उत्तर केरळमधील कासरगोड इथल्या श्री अनंतपुरा मंदिराच्या परिसरात दिसून आलेली एक महाकाय मगर हा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. या मगरीचे नाव ‘बाबिया’ (Babiya crocodile) असल्याचे सांगितले जात आहे आणि ही मगर अनेक वर्षांपासून मंदिराच्या परिसरातील तलावात राहात आहे. याशिवाय सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी की मगर शाकाहारी असल्याचे सांगितले आहे. असेही सांगितले जात आहे की, वर्षानुवर्षे मंदिराच्या तलावात राहात असूनही ती पहिल्यांदाच मंदिरात आली. पण ती कशी मंदिरात आली याबद्दल काहीही माहिती नाही.

या मगरीबद्दल असे मानण्यात येत आहे की, ती गेल्या ७० वर्षांपासून या मंदिराच्या परिसरातील तलावात राहात आहे पण आत्तापर्यंत तिने एकदाही हिंसक व्यवहार केलेला नाही. या तलावात पुरेशा प्रमाणात मासेही आहेत, पण या मगरीने आपल्या खाद्यासाठी कधीही त्यांच्यावर हल्ला केलेला नाही. बाबिया मगर आपल्या अन्नासाठी मंदिरातील प्रसादावर अवलंबून आहे जो तिला पूजेनंतर दिला जातो.

असे सांगितले जात आहे की, पुजारी या मगरीला दिवसातून दोन वेळा खायला घालतात. अनेकदा ते स्वतः तिच्या तोंडात भात घालतात. म्हटले जात आहे की या पुजाऱ्यांनी बोलावल्यानंतर ती तलावातून बाहेर येते. या दोघांमध्ये चांगलीच मैत्री आहे. ‘शाकाहारी’ मगरीची ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

 

News English Summary: A giant crocodile entered the premises of Sri Ananthapura temple in north Kerala’s Kasaragod on Tuesday. The surprise visitor is a ‘vegetarian’ croc named ‘Babiya’ who has been living in the temple’s pond for years. Priests said that this was Babiya’s first entry into the temple. Photos of Babiya inside the temple’s premises are being widely circulated on social media.

News English Title: Vegetarian crocodile reaches temple in Kerala photographs amaze people News Updates.

हॅशटॅग्स

#Kerala(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x