बेंगळुरू – कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा बुधवारी होणार असून त्यासाठी विरोधकांची एकजूट पाहावयास मिळत आहे. कुमारस्वामींच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा हजेरी लावणार आहेत.
उद्या म्हणजे २३ मे रोजी बेंगळुरू येथे जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. परंतु भाजपाला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशातील तब्बल १७ विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवले आल्याचे समजते.
त्यात काँगेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसपा अध्यक्षा मायावती, रजनीकांत तसेच सीताराम येचुरी आणि अनेक दिग्गज राजकारणी विशेष उपस्थिती दाखवणार आहेर. हा शपथ विधी म्हणजे एक प्रकारे विरोधकांच शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल.
