2 May 2024 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची चिंतामुक्त करणारी जबरदस्त योजना, दर महिना देईल 9000 रुपये IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा Vedanta Share Price | वेदांता शेअर्समध्ये मजबूत तेजी, स्टॉकने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, आता रु.500 पार होणार? Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी
x

मोदींच्या राज्यात पेट्रोल-डिझेल किमतीच्या भडक्याने लोकांच्या खिशाला आग | अजून विक्रमी दरांकडे कूच

Petrol Diesel

नवी दिल्ली , १३ जून | देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ही 96.12 रुपये आहे तर डिझेलची किंमत ही 86.98 रुपये इतकी आहे. शहरांचा विचार करता भोपाळमध्ये सर्वाधिक म्हणजे 104.29 रुपये पेट्रोलचा दर तर 95.60 रुपये इतका डिझेलचा दर आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वाधिक दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री होत आहे. त्या ठिकाणी पेट्रोल हे 107 रुपये तर डिझेल हे 100.05 रुपये इतके आहे.

पुढील विक्रमी दारांकडे वाटचाल:
पेट्रोल-डिझेलच्या विक्रमी दरांनंतर तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पेट्रोलचे दर १२१ रुपये प्रतिलिटर पार होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्यात अजून भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतं आहे.

 

News Title: Petrol Diesel news high record in the India news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x