14 July 2020 5:56 PM
अँप डाउनलोड

‘ठाकरे’ सिनेमा नक्की बघा! तो बनवतांना आम्ही अभिजीतची मेहनत पाहिली आहे: राजू पाटील

कल्याण : एकीकडे ठाकरे सिनेमाच्या प्रोमोवरून वाद निर्माण झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मात्र ‘ठाकरे’ सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यासाठी सर्वांनी अभिजित पानसेंच्या मेहनतीचे कौतुक करत सिनेमा आवर्जून पाहण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचे तर अनेक वरिष्ठांना त्याबाबद्दल बरेच माहिती असेल. परंतु, तरुणाईला त्यांच्याबद्दल सिनेमातून माहिती करून द्यायचे झाले तर, त्याचे सादरीकरण सुद्धा दर्जेदार असणे गरजेचे होते. त्यामुळे ‘रेगे’ सारख्या सिनेमातून आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडणारे मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ‘ठाकरे’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची जवाबदारी केवळ स्वीकारली नाही, तर तरुणांना त्या उत्तम सादरीकरणातून थियटर्सकडे येण्यास भाग सुद्धा पाडले आहे. स्वतःच त्यांची निवड करणाऱ्या निर्मात्यांना कदाचित तेच, सिनेमा पूर्ण झाल्यावर पचनी पडले नसावे की, या सिनेमाचे दिग्दर्शक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत.

सिनेमा जेव्हा कन्टेन्ट आणि त्याचे सादरीकरण यामध्ये सर्वोत्तम ठरतो, तेव्हा त्यामागे प्रचंड मेहनत असते हे विसरता येणार नाही. केवळ पैसा खर्ची पाडून विषय मार्गी लागत नसतो, तर त्या चित्रपटावर खर्ची पडलेला पैसा उत्तम सादरीकरनातून रसिकांच्या पचनी पडणे सुद्धा महत्वाचे असते. त्यामुळे निर्मात्याने सिनेमाच्या निर्मितीवर किती पैसा ओतला आहे, याच्याशी सिने रसिकांना काहीच देणे घेणे नसते, कारण मायबाप रसिक प्रेक्षक हा केवळ मला सिनेमाचं तिकीट कितीला पडलं आणि माझी करमणूक किती झाली एवढा साधा सरळ विचार तो करतो. त्यामुळेच गुंतवलेल्या पैशापेक्षा, त्यामागील प्रचंड मेहनतीला महत्व प्राप्त होते. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून प्रचंड मेहनत घेणारे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सिनेमा जिवंत केला आहे, यात वाद नाही.

त्यामुळेच त्यांची प्रचंड मेहनत जवळून पाहिलेले मनसेतील मित्र ‘ठाकरे’ चित्रपट नक्की पाहण्याचे आवाहन करत आहेत. कल्याण येथील मनसेचे नेते आणि मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मोदी लाटेत सुद्धा १ लाख २२ हजाराहून अधिक मतं घेणारे प्रमोद पाटील यांनी, त्यांच्या दिग्दर्शक मित्राचे कौतुक करत ‘ठाकरे’ सिनेमा पाहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(631)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x