3 July 2020 3:39 PM
अँप डाउनलोड

पुण्याच्या या चहा विक्रेत्याची महिन्याची कमाई आहे १२ लाख रुपये

पुणे : पुण्याच्या या चहा विक्रेत्याची महिन्याची कमाई आहे १२ लाख रुपये म्हणजे अगदी एखाद्या डॉक्टर आणि इंजिनियरच्या कमाई पेक्षाही अधिक असून त्याने चहा विक्रीचे विक्रम केले आहेत.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

पुण्याच्या या चहावाल्याचे नाव नवनाथ येवले असून पुण्यात तो ‘येवला टी हाऊस’ या नावाने प्रसिध्द आहेत. वाढत्या बेरोजगारीवर मध्यंतरी बरेच वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोडे विकणे हा सुध्दा एक रोजगार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर या वक्तव्यानेयुवक संघटना आणि विरोधकांनी बरीच टीका केली होती.

परंतु पुण्याच्या या चहा विक्रेत्याची महिन्याची कमाई आहे १२ लाख रुपये आहे ज्याने सर्वच अवाक झाले आहेत. पुण्यात त्यांचे येवले टी हाऊस नावाने तीन स्टॉल आहेत. त्यांच्या या टी स्टॉलवर रोज अनेक जण गरम चहाचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावत असतात.

नवनाथ येवलेंना ‘येवले टी हाऊस’ हे ब्रॅण्ड जगभर पोहोचवायचे आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी एनईला दिली आहे. परंतु पुढे त्यांनी असेही स्पष्ट केले की, पकोडे विकून जेवढा रोजगार निर्माण होत नाही, त्यापेक्षा अधिक रोजगार चहा विकण्यातून निर्माण होतो. चहा विकून होणाऱ्या उत्पन्नातून आपण समाधानी असल्याचेही नवनाथ येवले यांनी सांगितले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Yevale Tea Stall(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x