7 May 2021 10:39 PM
अँप डाउनलोड

शिवनेरीवर फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा

जुन्नर : किल्ले शिवनेरीवर आज ‘शिवनेरी स्मारक समितीच्या’ पुढाकाराने फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवनेरी स्मारक समितीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जागतिक युवा तत्त्वज्ञान परिषदेचे युवा तत्वज्ञ श्री. लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी त्यांच्या पत्नीसमवेत उपथिती लावून शिवाई मातेस अभिषेक केला. या उत्सवाला समितीचे इतर पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शिवाई मंदिरापासून ते शिवजन्मस्थाना पर्यंत छबिना पालखी मिरवणूक काढण्यात आली, तसेच बाल वारकऱ्यांच्या टाळ आणि मृदूंगाच्या साथीत पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली होती.

शिवजन्म साजरा केल्यानंतर ध्वजारोहण आणि धर्मसभा झाली त्यादरम्यान रेश्मा कोकणे यांना ‘जिजाऊ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. किल्ले शिवेनरीच्या पायथ्याशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

हॅशटॅग्स

#Shiv Jayanti(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x