27 May 2022 5:09 AM
अँप डाउनलोड

बजरंग पुनिया आणि विनोद कुमारला कांस्यपदक : आशियाई कुस्ती स्पर्धा

नवी दिल्ली : भारताच्या कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनोद कुमारला यंदाच्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विनोद कुमार ओमप्रकाशने ७० किलो फ्रीस्टाईल वजनी गटात आणि बजरंग पुनियाने ६५ किलो फ्रीस्टाईल वजनी गटात देशासाठी २ कांस्यपदकाची कमाई केली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने आता पर्यंत एकूण आठ पदकांची कमाई केली असून त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्य पादकांचा समावेश आहे.

गेल्यावर्षी भरलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने सुवर्णपदक कमावले होते. यंदा मात्र सुवर्ण पदक मिळविण्यात बजरंग पुनिया अपयशी ठरला असून, जपानच्या डायची टकाटनीने बजरंग पुनियाला ७-५ इतक्या फरकाने पराभूत केले आहे. त्यामुळे बजरंग पुनियाला यंदा कांस्य पदकावरच समाधानी रहावे लागले.

तर दुसरीकडे विनोद कुमारला उजबेगिस्तानच्या इख्तियार नवरोजने ६-३ असे पराभूत केले. यंदाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत नवज्योत कौरने ६५ किलो वजनी गटात आतापर्यंत भारतासाठी एक सुवर्णपदक पटकावून नवा इतिहास नोंदविला आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी नवज्योत कौर ही पहिली महिला ठरली आहे.

हॅशटॅग्स

#Asian Wresting Championship 2018(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x