19 January 2022 1:51 AM
अँप डाउनलोड

कलम ३७०: काश्मीरचा विशेष दर्जा काढून मोदींनी घातक चूक केली - इम्रान खान

Jammu Kashmir, Pakistan PM Imran Khan, PM Narendra Modi

इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातक चूक केली आहे, असा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केला. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथील विधिमंडळात इम्रान खान बोलत होते. मोदी यांनी निवडणुकीमध्ये पाकिस्तानचा वापर बळीच्या बकऱ्यासारखा केला. त्यामुळे त्यांना जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करावा लागला, असा आरोपही इम्रान खान यांनी केला.

पाकिस्तानात बुधवारी काश्मीर समर्थन दिन पाळण्यात आला, त्या निमित्ताने त्यांनी हे विधान केले. काश्मिरी लोकांच्या लढय़ाला पाकिस्तानातील अनेक लोकांनी पाठिंबा दिला आहे. ५ फेब्रुवारी हा पाकिस्तानात काश्मीर समर्थन दिन म्हणून पाळला जातो. इम्रान खान यांनी सांगितले, ‘नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्टला काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करून जी कृती केली, त्यामुळे एक दिवस काश्मीर स्वतंत्र होणार असा मला विश्वास वाटतो. त्यांनी हे पाऊल उचलले नसते तर काश्मीर प्रश्न इतक्या तीव्रतेने जगसामोर आला नसता. आता आम्ही जगापुढे सगळी परिस्थिती मांडू.’

मोदींनी भारताला जेथे नेले आहे तेथून मागे जाणे शक्य नाही. हिंदू राष्ट्रवादाचे भूत बाटलीतून बाहेर आले असून, त्याला मागे घेता येणार नाही’ असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तसेच ‘या घडामोडींच्या साखळीतून अखेर काश्मीर स्वतंत्र होणार आहे’ असा दावाही त्यांनी केला आहे. ‘मोदी यांनी 5 ऑगस्टला केलेल्या कृतीनंतर काश्मीर स्वतंत्र होईल हा माझा विश्वास आहे. हा निर्णय त्यांनी घेतला नसता, तर हा मुद्दा त्यांना जगासमोर अधोरेखित करता आला नसता. त्याबद्दल जगाला सांगणे हे आपली जबाबदारी असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title:  Pakistan Prime Minister Imran Khan slams PM Narendra Modi says he committed fatal mistake revoking special status Jammu Kashmir.

हॅशटॅग्स

#ImranKhan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x