26 April 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा
x

अमरिकेचे परराष्ट्र सेक्रेटरी पॉम्पीओ यांच्या मसूद अझहर विषयक ट्विटने मोदी तोंडघशी

Donald Trump, America, Narendra Modi, Loksabha Election 2019

वॉशिंग्टन : अमेरिकेचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएचे माजी अध्यक्ष माईक पॉम्पीओ यांनी मसूद अझहर विषयक एक ट्विट केल्याने नरेंद्र मोदी तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे. भारतात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि विशेष करून मोदी ‘जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर याला आमच्या प्रयत्नाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित केल्याच्या बाता मारून, प्रचारात स्वतःची पाट थोपटून घेत असल्याचे काल पासून पाहायला मिळत आहे.

मात्र अमेरिकेचे परराष्ट्र सेक्रेटरी पेमपीओ यांनी अधिवृत्तपणे ट्विट करताना म्हटलं आहे की,”जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर याला दहशदवादी घोषित करण्यापूर्वी त्याच्यासोबत बोलणी करणाऱ्या टीमचे अभिनंदन. आम्ही या कारवाईची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो आणि हा अमेरिकन कूटनीतीचा आणि दहशदवादाविरुद्ध लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा विजय आहे. तसेच दक्षिण आशियातील शांततेसाठी हे मोठं पाऊल आहे’.

त्यामुळे मोदींचा आणि भाजपाचा श्रेया घेण्याचा दावा फोल ठरला असून ‘जैश ए मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहर यांच्यासोबत अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती यापूर्वीच सदर विषयाला अनुसरून बोलणी करत होते हे अधिकृतरीत्या उघड झाल्याने मोदींची पुन्हा पंचायत झाली असून, भाजप पुन्हा तोंडघशी पडल्याची चर्चा रंगली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x