27 May 2022 5:19 AM
अँप डाउनलोड

एनडीएला धक्का, चंद्राबाबूंचा पक्ष टीडीपी एनडीएतून बाहेर

नवी दिल्ली : आज एनडीएला मोठा राजकीय धक्का मिळाला आहे. कारण एनडीएतील प्रमुख घटक पक्ष टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांचे दोन केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना ताबडतोब राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पक्षाचे सर्वेसेवा चंद्राबाबू नायडू यांनी तशी अधिकृत घोषणा केली आहे. पुढे चंद्राबाबू असे ही म्हणाले की, एक जबाबदार राजकारणी म्हणून आणि राजकारणातील जुना जाणता नेता म्हणून आम्ही पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नं केला जेणेकरून त्यांना आमचा निर्णय सांगता यावा. परंतु पंतप्रधानांना आमच्यासाठी वेळच नव्हता असा दुजोराही त्यांनी घोषणा करते वेळी जोडला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले होते कि, त्यांच्या राज्याला विशेष दर्जा देणे शक्य नाही. कारण विशेष राज्याचा दर्जा दिल्यावर त्या राज्याला विशेष आर्थिक पॅकेज मिळत जे प्रत्येक राज्याला देणे शक्य नसते असं ते स्पष्टीकरण देताना म्हणाले. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या विभाजनावेळी आंध्र सरकारला विशेष दर्जा देण्याचं वचन देण्यात आला होत कारण त्यावेळी तशी तरतूद होती. परंतु १४ व्या वित्तीय आयोगाच्या अहवालानुसार तसा विशेष दर्जा देऊ शकत नाही असे ही जेटली पुढे म्हणाले.

मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा दिला जाऊ शकत नाही असे विधान करताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे सर्वेसेवा चंद्राबाबू नायडू यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आणि अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला.

हॅशटॅग्स

#Chandrababu Naidu(2)#TDP Exit NDA(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x