20 September 2021 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Crime Patrol | गुजरातमधील मुंद्रा बंदरातून तब्बल 9 हजार कोटींचे हेरॉइन जप्त Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस
x

आशा सेविकांना मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळणार | आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे

Asha Health workers

मुंबई, २३ जून | महाराष्ट्रातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा आशा संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

१५ जूनपासून आशा सेविक संपावर असल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य आशा कर्मचारी कृती समितीसमोर एक हजार रुपये मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, याला कृती समितीने तीव्र विरोध केला होता. अखेर आज झालेल्या बैठकीमध्ये आशा सेविकांना १ हजार रुपये मानधनवाढीसोबतच ५०० रुपये कोविड भत्ता देखील देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलं आहे. येत्या १ जुलैपासून ही नवी मानधनवाढ आणि कोविड भत्ता लागू होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. या तोडग्यावर समाधान झाल्यामुळे चर्चेनंतर कृती समितीने संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Asha Health workers strike called off state after meeting with health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x