3 May 2024 9:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

राजापूर रिफायनरीच्या बाजूने मतदान | शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी

Rajapur refinery

राजापूर, २३ जून | रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरीच्या बाजूने मतदान केल्याचा ठपका ठेवत नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी केली गेली. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवीयांनी नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांच्यावर ही कारवाई केली.

रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव मंगळवारी राजापूर नगरपरिषदेने मांडला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेच्या दोन नगरसेविकांनी समर्थन देत हा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांना या ठरावाला पाठिंबा देत मतदान केलं. त्यानंतर पक्षाचा आदेश असतानाही खडपे यांनी रिफायनरीच्या बाजूने मतदान केल्यावरुन आमदार राजन साळवी यांनी प्रतिक्षा खडपे यांच्यावर कारवाई केली.

राजापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होती. या ऑनलाईन सभेला ठरावाच्या बाजूने मतदान करताना शिवसेनेच्या आणखी एक दुसरी नगरसेविका ऑनलाईन नव्हती. त्या नगरसेविकेनेही ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सभेच्या ठरावावर ज्या वेळी या नगरसेविकेची स्वाक्षरी होईल त्यावेळी या नगसेविकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हायला हवा, यासाठी आवाज उठलेला असताना राजापूर नगरपरिषदेनेही रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन करताना तसा ठराव मंजूर केला. हा ठराव अकरा विरुद्ध पाच असा मंजूर झाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Shivsena took action against corporator Pratiksha Khadpe who was voted in favor of Rajapur refinery news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x