13 December 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

मोबाइल रिचार्ज, पंखे, पुस्तकांची दुकानं, अन्न प्रक्रिया उद्योग सुरू राहणार

Corona crisis, lockdown

नवी दिल्ली, २३ एप्रिल: सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला करोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एका दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मागच्या २८ दिवसात देशातील १२ जिल्ह्यांमध्ये करोना व्हायरसचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. मागच्या १४ दिवसात देशातील एकूण ७८ जिल्ह्यांमध्ये एकाही व्यक्तीला करोना व्हायरसची लागण झालेली नाही. आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी ही माहिती देण्यात आली. त्यानंतर केंद्राने इतर महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

त्यानुसार सरकारने शहरी भागातील अन्न प्रक्रिया उद्योग जसे दूध डेअरी, ब्रेडचे कारखाने (बेकरी), पीठाच्या गिरण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मोबाइल प्रीपेड रिचार्ज करण्यासाठी रिचार्जची दुकानंही सुरू राहतील. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्याची दुकानं सुरू ठेवण्यासही सरकारने मुभा दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानंही सुरू राहतील, असं गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने या संदर्भात राज्यांना २१ एप्रिलला पत्र पाठवलं आहे. फळांची आयात- निर्यात, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्थांना, मधमाशी पालन आणि त्यासंबंधीच्या व्यवहारांना सूट दिली गेली आहे, असं गृहमंत्रालाने पत्रात म्हटलं आहे.

 

News English Summary: The government has allowed food processing industries in urban areas such as dairy, bread factories (bakery), flour mills to start. Recharge shops will also continue to offer mobile prepaid recharges. The government has also allowed the fan shop to continue as it is a summer day. Also, as books are required for students, book shops will also continue, the Home Ministry has clarified.

News English Title: Story Corona virus India prepaid mobile recharge utilities and food processing units in urban areas are exempted from lockdown says home ministry News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x