6 May 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

राज्यातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope, Corona Hotspot, Maharashtra

मुंबई, २३ एप्रिल: देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबापुरीला कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा रोज वाढत असताना, मुंबई महापालिकेने विभागवार कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची यादी जाहीर केली आहे. ही यादी मुंबईकरांसाठी दिलासा देणारी नक्कीच आहे.

मुंबई महापालिकेने बुधवारी कोरोनाबाधित लोकं बरे होऊन आपल्या घरी जातात याबाबतची आकडेवारी नकाशासह जारी केली आहे. या नकाशात सर्वात जास्त रुग्ण असलेल्या वरळी विभागात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या सर्वात जास्त असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. वरळी विभागातील ६७ रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.

दरम्यान आता महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरुन ५ वर आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाले आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही.”

 

News English Summary: The number of Corona hotspots in Maharashtra has been reduced from 14 to 5. The number of coronary heart disease patients in the state has doubled to seven days. Corona is being prevented and treated by the state government as per the guidelines of the World Health Organization, ICMR. The state is not in a state of panic.

News English English: Story Corona hotspot count decreased in Maharashtra says health Minister Rajesh Tope News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x