26 April 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

कोरोना चिंता: अमेरिका आणि स्पेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Corona Virus Emergency, America, Spain, President Donald Trump

वॉशिंग्टन, १४ मार्च : जगभरात कोरोनाने कहर केला आहे. या व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेसह जगभरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अमेरिकेमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि वाढता संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी मोठे निर्णय घेतले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. या व्हायरससोबत लढण्यासाठी ट्रम्प यांनी 5 हजार कोटींची तरतूद केली आहे. या आधी कोरोनाचा सामना करण्यासाठी स्पेनमध्येही राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. हात त्याग आपल्याला भविष्यात फायदेशीर ठरेल. पुढचे आठ आठवडे अत्यंत कठीण आहेत. अमेरिकेत आतापर्यंत ११००हून जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून ४० लोकांचा मृत्यू झाला, असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, कोरोनाने अमेरिकेसारख्या विकसित देशासमोर मोठे आव्हाण निर्माण केले आहे. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि तपासणीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊलं उचलली आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.

करोनासारख्या विषाणूशी लढा सुरू असल्याबद्दल ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. “राष्ट्रीय आणीबाणी हे मोठे शब्द आहेत. या निर्णयाने अमेरिका सरकार आजाराशी लढा देण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावेल,” असंही ते म्हणाले.

 

News English Summery: Corona has wreaked havoc worldwide. The growing infection with the virus has created a panic around the world with the United States. US President Donald Trump declared a state of emergency in the United States late Friday night, citing the growing threat of the Corona virus. “They have made big decisions to prevent the spread of corona virus infection and infection,” the press conference said. To combat this virus, Trump has made a provision of 5000 crores. Prior to this, a national emergency was also announced in Spain to deal with Corona. Trump said at a press conference: ‘There are a lot of things you have to take away. Hands down will benefit you in the future. The next eight weeks are extremely difficult. More than 1,100 people have been infected with coronas in the United States so far, and 40 have died, he said. Also, Corona has made a big appeal to a developed country like the United States. He said the administration has taken several important steps to cope with the corona in an emergency and to ensure the availability of the investigation.

 

News English Title: Story corona virus impact emergency declared in America and Spain News latest updates.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x