25 April 2024 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

CoronaVirus: घाबरून जाऊ नका...अफवा पसरवू नका! हा VIDEO पहा

Health Minister Rajesh Tope, Corona Virus

मुंबई: ‘महाराष्ट्रात एकही करोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. करोना व्हायरस जगभरात वेगानं फोफावू लागल्यानं अफवांनाही वेग आला आहे. त्यामुळं ठिकठिकाणची सरकारं व प्रशासनाकडून नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना निर्धास्त राहण्याचं आवाहन केलं आहे.

तसेच ‘करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून वैद्यकीय पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज आहेत. राज्य सरकार योग्य ती खबरदारी घेत आहे. ‘करोना’च्या संशयितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दहा खाटा स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाग्रस्तांवर उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे,’ अशी माहितीही टोपे यांनी दिली.

दरम्यान, भारतात करोनाचे एकूण २८ रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. सध्या करोना व्हायरसंबंधी देशात काय स्थिती आहे यासंबंधी हर्षवर्धन यांनी सविस्तर माहिती दिली. राजधानी दिल्लीत करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढली तर तयारीच्या दृष्टीकोनातून रुग्णालयांना चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती यावेळी हर्षवर्धन यांनी दिली.

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळावे. सध्या अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. इतर व्हायरस प्रमाणेच यावरही उपचार आहे. मृत्यू दर फक्त 2 टक्के आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 15 प्रयोगशाळा पूर्वी स्थापन केल्या गेल्या होत्या. यापुढे आणखी 19 प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. सध्या देशात एकूण 34 लॅब उभे केले आहेत. इराणमधील भारतीयांसाठी तेथे एक लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांना भारतात आणले जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

News English Summery: Meanwhile, there are a total of four coronary patients in India, Union Health Minister Harshvardhan said. Harshvardhan gave detailed information about the status of Corona virus in the country. Harshavardhan informed that the hospitals have been instructed to set up a separate ward of good quality in case of corona virus increase in the capital Delhi. Avoid getting into the crowd to prevent the spread of the corona virus. More precautions are needed right now. It has the same treatment as other viruses. The death rate is just 2 percent. 15 labs were established earlier to prevent the spread of the corona virus. A further 19 labs have been set up. Currently there are 34 labs in the country. An effort is being made to start a lab there for Indians in Iran. They will be brought to India after being inspected there, the Union Health Minister said.

 

Web News Title: Story Corona Virus no Patient found in Maharashtra says Maharashtra State Health minister Rajesh Tope.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x