6 May 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार? Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळणार, 700 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी शेअर्सची लिस्ट, अल्पावधीत मालामाल Tata Power Share Price | टाटा पॉवर स्टॉक चार्टमध्ये 'या' प्राईसवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर BHEL Share Price | PSU बीएचईएल शेअर्स घसरले, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांनी खुशखबर दिली
x

बहुमत मिळणार नसल्याने मोदी लवकरच सरसंघचालकांची भेट घेणार; नागपूर लॉबी सक्रिय?

RSS, Narendra Modi, Mohan Bhagwat, Loksabha Election 2019

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या २ दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्यार असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात जाऊन विविध मुद्द्यावर सरसंघचालकांशी चर्चा करणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहेत आणि त्यामुळे २ दिवसांपूर्वी होणाऱ्या या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.

मागील ४ वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ मुख्यालयातील पहिला दौरा आहे. लोकसभा निवडणुकीत NDA ला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर अशा स्थितीत RSS पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या ऐवजी दुसऱ्या नावाचा विचार करु शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीतून मोदी संघाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत का? अशी देखील शक्यता अनेक राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे. मागील अनेक वर्षे मोदींनी संघ मुख्यालयापासून लांब राहणं पसंत केलं होतं.

भारतीय जनता पक्षाच्या नागपूर येथील ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन करेल पण बहुमत मिळालं नाही तर नरेंद्र मोदींसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. अखेर भाजपाच्या राजकारणामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे नेमकं काय शिजतंय हे आगामी काळात स्पष्ट होईल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x