14 November 2019 1:16 PM
अँप डाउनलोड

गडकरी पंतप्रधान व्हावे हीच संघाची इच्छा, असं कोण म्हणाल ? सविस्तर

विदर्भ : २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर देशात नरेंद्र मोदी यांचे फेकू सरकार आले तर संपूर्ण देशात राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा भारतात कधीच निवडणूक होणार नाहीत हे तुम्ही लिहून ठेवा असा गौप्यस्फोट केला आहे गुजरात पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने.

सध्या देशात ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावरून कळत आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मोदींवर नाराज आहे. संघाचीच इच्छा आहे की, एनडीएच्या नव्हे तर भाजपच्या जागा कमी व्हाव्यात आणि तसे झाल्यास संघाला पंतप्रधान पदी नितीन गडकरी यांना विराजमान करणे सोपे होईल अशीच सध्या संघाची रणनीती असल्याचा गौप्यस्फोट हार्दिक पटेल यांनी केला.

हार्दिक सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून विदर्भ युथ फॉर्मच्यावतीने अकोल्यातील स्वराज्य भवनात एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्याने हा गौप्यस्फोट केला. त्यावेळी त्याच्यासोबत राजस्थानातील सहकारी हिंमत गुजर, अमित पटेल सुद्धा व्यासपीठावर उपस्थित होते.

पुढे हार्दिक पटेल असे म्हणाले की, देशात सीमेवर जवान आत्महत्या करतात याची नरेंद्र मोदींना काळजी नाही. केवळ देशात कोण कोणत्या राज्यात भाजपचे सरकार बनावे याचीच त्यांना प्रचंड काळजी असते अशी बोचरी टीका हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये असं त्याने आव्हाहन सुद्धा केलं, तसेच तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा तुमच्या मागण्यांसाठी सरकार विरोधात आवाज उठवा आणि मला तुम्ही कधी सुद्धा मदतीची हाक द्या मी तुम्हाला नक्कीच साद देईन. सध्या देशातील शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असं हि तो उपस्थितांना संबोधित करताना म्हणाला.

महाराष्ट्रात अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू, गुजरात मध्ये नर्मदा सरोवरावर सरदार पटेलांचा स्टॅच्यु ऑफ लिबर्टी तर उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळाल्यास राम मंदिर उभारू असं नरेंद्र मोदी म्हणाले, परंतु हे त्यांनी सत्तेत आल्यावर काहीच केलं नाही आणि ते केवळ तुम्हाला खोटी आश्वासनं देत राहिले. लोकांना राम मंदिर किव्हा बाबरी मशीद मध्ये गुंतवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि बेरोजगारांना रोजगार हेच आमचे ध्येय असल्याचे हार्दिक पटेल म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे फेकू आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सत्तेत आल्यावर स्वामिनाथन आयोग आणि शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची हमी निवडणुकीपूर्वी दिली होती. परंतु निवडून आल्यावर त्यांनी यातलं एक ही आश्वासन पूर्ण केलं नाही असं वक्तव्य या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर ढोणे यांनी उपस्थितांना संबोधित करताना केलं.

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या