20 September 2021 1:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न
x

पक्षांतर रोखणारा कायदा करा, गडकरींच्या विधानाने विरोधकांमध्ये कुजबुज

मुंबई : एका खासगी वृत्तवाहिनीच्या सन्मान सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गडकरी म्हणाले सत्ता आली की लोक उंदरासारखे इकडून तिकडे उड्या मारतात, त्यामुळे देशात पक्षांतर रोखणारा कायदा असायला हवा असं ते उपस्थितांना संबोधीत करताना म्हणाले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एका खासगी वृत्तवाहिनीच्या अनन्य सन्मान सोहळ्याला नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राजकारणातील बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले शेकापचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना या कार्यक्रमाला अनन्य जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पाकिस्तानी मधील हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करणारे शूरवीर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा ही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे तसेच विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना गडकरी म्हणाले की, सत्ता आली की लोक उंदरासारखे इकडून तिकडे उड्या मारतात, त्यामुळे देशात पक्षांतर रोखणारा कायदा असायला हवा असं मत व्यक्त केलं. परंतु त्यांच्या या वक्तव्याची चर्चा मात्र जोरात सुरु झाली आहे की, देशात सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका जवळ आल्या आहेत आणि भाजपचे सर्वच नेते दावा करत आहेत कि २०१९ मध्ये भाजपच सत्तेत येणार आहे. मग तरी ही नितीन गडकरींना हा पक्षांतर रोखणारा कायदा असावा असं आताच ते सुद्धा निवडणुकीला काही महिने शिल्लक असतानाच का वाटू लागलं आहे ? अशी एकच कुजबुज सुरु झाली आहे.

कारण २०१४ मधील निवडणुकीत आणि पुढील काही वर्ष जवळ-जवळ सर्वच पक्षातील नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता, त्याला कारण होतं मोदी लाट. मग आता हवा नक्की कोणत्या दिशेला वाहते आहे, त्यामुळे गडकरींना हा पक्षांतर बंदीचा कायदा आठवला ? अशी चर्चा विरोधकांमध्ये रंगली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1650)#Nitin Gadkari(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x