27 July 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

आणखी एक १३९४.४३ कोटींचा मोठा घोटाळा

मुंबई : सर्वात आधी पीएनबी १३ हजार कोटी आणि अनेक बँकेचे घोटाळे गाजत असताना आता पुन्हा युनियन बॅंकेसहित आठ बँकांमध्ये १३९४.४३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीविरुद्ध युनियन बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक टोटेमपुदी कविता आणि टोटेमपुदी सलालिथ या दोघांविरुध्द सीबीआयने गुन्हा दाखल केला असून युनियन बँकेने सीबीआयकडे तशी रीतसर तक्रार दाखल केली होती.

टोटेमपुदी कविता आणि टोटेमपुदी सलालिथ यांच्या टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने युनियन बँक ऑफ इंडिया सहित तब्बल ८ बँकांकडून कर्ज घेतलं होत, त्यांच्या इंडस्ट्रियल फायनान्स ब्रांचने टोटेम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ३१३ कोटींचं कर्ज दिले होते. बँकेच्या तक्रारी नंतर सीबीआयने कंपनीच्या संचालकांची चौकशी सुरु केल्याचे वृत्त ए.एन.आय ह्या वृत्त वाहिनेने दिले आहे.

संपूर्ण देशभरात बँकेतील या महाघोटाळ्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, सर्वसामान्य लोकांकडून खूप तिखट प्रतिक्रिया येत आहेत. या आधीच्या सर्व घोटाळ्यातील आरोपींनी आधीच परदेशी पलायन केले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Nirav Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x