14 December 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

राफेल लढाऊ विमानाची किंमत सांगा आणि ५ कोटी जिंका; बिहारमध्ये सर्वत्र पोस्टर्स

पाटणा : काँग्रेस राफेल लढाऊ विमानांच्या करारावरून भाजपला आणि मोदींना लक्ष करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. फ्रान्स मधील प्रसार माध्यमांनी या करारावर आणि विशेष करून अनिल अंबानींच्या कंपनीवर संशय व्यक्त केल्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात आता इतर राज्यातील स्थानिक नेत्यांनी सुद्धा राफेल लढाऊ विमानांच्या किमतींवरून मोदींच्या अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे.

त्याचाच भाग म्हणजे बिहार मधील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी पाटणा शहरात ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवरुन काँग्रेस आणि भाजपामध्ये कलगीतुरा सुरु झाला आहे. पाटण्यात लावण्यात आलेल्या पोस्टरध्ये मोदींच्या सत्ताकाळात तयार करण्यात आलेल्या ३५ विमानतळांची नावे आणि राफेलची किंमत सांगणाऱ्या व्यक्तीला तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते सिद्धार्थ क्षत्रिय आणि व्यंकटेश रमन यांच्या नावे शहरातील प्रमुख मुख्य चौकांमध्ये हे पोस्टर्स लावले आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या या पोस्टरबाजीमुळे भाजपने सुद्धा संताप व्यक्त करत उत्तर दिले आहे. भाजपचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, पोस्टरमध्ये देण्यात आलेले बक्षिस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच जिंकतील. तसेच, कोणतेही ठोस कारण नसताना राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात मोदींना, भाजप आणि केंद्र सरकारला काँग्रेस अध्यक्ष जाणूनबुजून ओढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x