24 September 2020 11:23 PM
अँप डाउनलोड

मोदी सरकारने राफेल खरेदीच्या माध्यमातून भारतीय सैन्यावरच सर्जिकल स्ट्राइक केला: राहुल गांधी

नवी दिल्ली : लवकरच भारतात सर्जिकल स्ट्राइक दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारच्या अडचणी खुद्द फ्रान्समधून आलेल्या प्रतिक्रियेतून वाढल्याचे चित्र आहे. या खरेदी व्यवहारातील करारावर काँग्रेसने आधीच अनिल अंबानींच्या सहभागावर संशय व्यक्त केला होता. त्यावर मोदी सरकारने हात झटकले होते. परंतु भाजपने दिलेल्या प्रतिक्रियेच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी दिली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

खुद्द फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी टिपणी केल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा आता अधिक आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी भाजपचा आणि मोदी सरकारचा समाचार घेताना म्हणाले की, राफेल खरेदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय भडका उडण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करताना मोदी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांनी मिळून सुरक्षा दलावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राइक केला आहे. मोदीजी तुम्ही देशाचा विश्वासघात केला आहे. तुम्ही आमच्या सैनिकांच्या रक्ताचा अपमान केला आहे’, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1317)#Rahul Gandhi(189)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x