25 January 2025 5:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना सेव्ह करा, महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा EPFO New Rule | खाजगी कर्मचाऱ्यांनो, EPFO ने नियम बदलले, कागदपत्रांशिवाय प्रोफाइल अपडेट करा, अन्यथा घामाचा पैसा गमवाल New Auto Taxi Fare | अच्छे दिन आ गए, बस, रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात मोठी वाढ, इतके पैसे मोजावे लागणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात दुपटीने वाढ, शेअर प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, प्राईस बँड सह डिटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, चॉइस इक्विटी ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

NBCC Share Price | PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक प्राईस 250 रुपयांची लेव्हल स्पर्श करणार - Marathi News

Highlights:

  • NBCC Share PriceNSE: NBCC – एनबीसीसी इंडिया अंश
  • मागील 2 वर्षात 414% परतावा दिला
  • गुंतवणूकदारांना 15 वेळा लाभांश वाटप – NBCC Share
  • चॉईस ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग – NSE:NBCC
NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीची शेअर्स तेजीत वाढत आहेत. 27 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स 56.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवरून 207 टक्के वाढले आहेत. 31 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. गुंतवणूकदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने 7 ऑक्टोबर 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. (एनबीसीसी इंडिया अंश)

या नवरत्न कंपनीचे बाजार भांडवल 31,338.00 कोटी रुपये आहे. यासह कंपनीने आपल्या शेअरच्या दर्शनी मूल्यावर 63 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी कंपनीने 6 सप्टेंबर 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. एलआयसी कंपनीने देखील NBCC इंडिया कंपनीमध्ये 5.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के वाढीसह 176.89 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 2 वर्षात 414% परतावा दिला
एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 209.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.71 रुपये होती. मागील एका महिन्यात एनबीसीसी इंडिया स्टॉक 5 टक्के घसरला आहे. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीचे शेअर 112 टक्के वाढले होते. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 193 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात एनबीसीसी इंडिया स्टॉक 414 टक्के वाढला आहे.

गुंतवणूकदारांना 15 वेळा लाभांश वाटप
30 ऑगस्ट 2012 पासून आतापर्यंत एनबीसीसी इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 15 वेळा लाभांश वाटप केला आहे. मागील 1 वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीने 0.63 रुपये लाभांश वाटप केला होता. एनबीसीसी इंडिया कंपनीने आपली 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली आहे.

चॉईस ब्रोकिंग फर्म – BUY रेटिंग
FII/FPI ने जून 2024 तिमाहीमध्ये एनबीसीसी इंडिया कंपनीमधील आपली शेअर होल्डिंग 4.33 टक्केवरून 4.43 टक्केपर्यंत वाढवली आहे. म्युच्युअल फंडांनी जून 2024 तिमाहीत आपली शेअर होल्डिंग 2.98 टक्केवरून 3.04 टक्केपर्यंत वाढवली आहे. चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते एनबीसीसी इंडिया स्टॉक पुढील काळात 220-250 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Share Price 23 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x