
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये मागील तीन महिन्यात 17 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीचे शेअर्स (NSE: PatelEngineering) जबरदस्त तेजीसह हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. नुकताच या कंपनीने तीस्ता-V पॉवर स्टेशन उभारण्यासाठी एनएचपीसी कंपनीसोबत 240 कोटी रुपयेचा करार केला आहे. (पटेल इंजिनीअरिंग कंपनी अंश)
20 सप्टेंबर रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 60.4 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कराराअंतर्गत पटेल इंजिनिअरिंग कंपनीला सिक्कीममधील तीस्ता-V पॉवर स्टेशनमध्ये डायव्हर्शन बोगद्याला बोगद्याच्या स्पिलवे व्यवस्थेमध्ये बदलण्याचे नागरी आणि हायड्रो-मेकॅनिकल काम देण्यात आले आहे.
कंपनीला मिळाला नवीन प्रकल्प
आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के वाढीसह 60.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पटेल इंजिनिअरिंग कंपनीला मिळालेला नवीन प्रकल्प पुढील 18 महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पूर्वोत्तर प्रदेशात पटेल इंजीनियरिंग लिमिटेड कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी भर पडेल.
317.60 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला
सध्या पटेल इंजिनिअरिंग कंपनी NHPC च्या Singtam, Sikkim जवळ तिस्ता-VI प्रकल्पावर काम करत आहे. मागील महिन्यात पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीने आपल्या जॉईंट व्हेंचरसोबत महाराष्ट्र सरकारच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून 317.60 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळवला होता. या कराराअंतर्गत पटेल इंजिनिअरिंग कंपनीला जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि संबंधित काम देण्यात आले आहे.
पटेल इंजिनिअरिंग कंपनीने एप्रिल-जून 2024 तिमाहीत आपल्या एकत्रित निव्वळ नफ्यात 26 टक्के वार्षिक वाढ नोंदवली होती. जून तिमाहीत या कंपनीने 48.17 कोटी रुपये निव्वळ नफा कामाला होता. जून तिमाहीत पटेल इंजीनियरिंग कंपनीचा महसूल 1,118.61 कोटी रुपयेवरून कमी होऊन 1,101.66 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. वार्षिक आधारावर या कंपनीच्या महसूल संकलनात 1.52 टक्के घट झाली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.