12 December 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Investment Scheme | या जबरदस्त गुंतवणूक योजनेत प्रत्येक महिन्याला नियमित गुंतवणुक करून तुम्हाला 45 लाखाचा परतावा मिळेल

Investment Scheme

Investment Scheme | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ जिला आपण LIC म्हणून ओळखतो, ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक गुंतवणूक योजना चालवते. यामध्ये गुंतवणूक करून लोकांना जबरदस्त परतावा मिळू शकतो. परंतु अनेक वेळा आपल्याला एलआयसीच्या धोरणाची आणि गुंतवणूक नियमांची माहिती नसते. तुम्ही गुंतवणूक करून नफा कमावण्यासाठी LIC च्या नियमित प्रीमियम युनिट लिंक्ड प्लान, SIIP मध्ये गुंतवणूक करू शकता. या गुंतवणूक योजनेअंतर्गत, तुम्हाला दर महिन्याला फक्त 4000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि तुमच्या गुंतवणूकवर तुम्हाला 21 वर्षानंतर 45 लाख रुपये परतावा मिळू शकतो. चला तर मग या गुंतवणूक योजनेबद्दल सविस्तर माहिती जाऊन घेऊ

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
समजा तुमचे सध्याचे वय 44 वर्ष असल्यास, LIC च्या SIIP योजनेमध्ये तुम्हाला 21 वर्षांसाठी म्हणजेच वयाच्या 65 वर्ष पर्यंत दरमहा 4,000 रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे, तुमचा एक वर्षाचा प्रीमियम 48,000 रुपये असेल आणि या योजनेची एकूण गुंतवणूक 10,08,000 रुपये असेल. योजनेच्या शेवटी, तुम्हाला 45 लाख रुपये परतावा मिळू शकतो. म्हणजेच तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर तब्बल 34,92,000 रुपये नफा मिळेल. तुम्ही हा नफा आणखी वाढवू शकता. या गुंतवणूक योजनेंतर्गत, जर तुम्ही एका वर्षाचा प्रीमियम एकत्र भरला तर तुम्हाला वार्षिक 48000 रुपये भरण्याची गरज नाही तर केवळ 40000 रुपये भरावे लागतील. तुमची 8000 रुपये बचत होईल.

विशेष बाब म्हणजे तुम्हाला या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यावर संपूर्ण कालावधीत जीवन विम्याचा लाभही मिळतो. गुंतवणूकदारांना 4,80,000 रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. गुंतवणूकदार बाँड फंड, सुरक्षित फंड, बॅलन्स्ड फंड आणि ग्रोथ फंड अंतर्गत गुंतवणूक फंड निवडू शकतात.

नियम लक्षात ठेवा :
या योजनेत सरासरी परिपक्वता रक्कम वार्षिक 15 टक्के एनएव्ही वाढीच्या दरावर आधारित असते. पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीनंतर योजनाधरक आणि गुंतवणूकदार कधीही आपली योजना सरेंडर करू शकतात आणि पैसे काढू शकतात. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांना योजना रद्द केल्यावर सरेंडर शुल्काशिवाय सरेंडर व्हॅल्यू देखील मिळते. यासाठी डिमॅट खात्याची आवश्यकता ही लागत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Scheme in LIC for high return in long term on 9 September 2022.

हॅशटॅग्स

#Investment Scheme(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x