15 May 2021 1:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
x

राफेल करारासाठी दसॉल्टला रिलायन्ससोबत व्यवहाराची अट घालण्यात आली होती? मीडियापार्टचा गौप्यस्फोट

पॅरिस : भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या राफेल या लढाऊ विमान खरेदी करारावरून फ्रान्सच्या प्रसार माध्यमांकडूनच नवे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. राफेल विमान करारासाठी फ्रान्समधील दसॉल्ट एव्हिएशन या कंपनीसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहार करण्याची अट घालण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा फ्रान्समधील मीडियापार्ट या नामांकित डिजिटल न्युजने केला होता. दरम्यान, दसॉल्ट एव्हिएशनने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, आम्ही केवळ स्वायत्तमपणे भागीदार म्हणून रिलायन्सची निवड केल्याचे स्पष्ट केलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

फ्रान्सस्थित न्युज पोर्टल मीडियापार्टने दिलेल्या वृत्तामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार दसॉल्ट एव्हिएशनसमोर अनिल अंबानींच्या रिलायन्ससोबत व्यवहारकरण्याची अट घालण्यात आली होती. त्यानुसार भागीदारीसाठी रिलायन्सशिवाय अन्य कोणताही दुसरा पर्याय दसॉल्ट एव्हिएशनला देण्यात आला नव्हता. दसॉल्ट एव्हिएशनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर नागपूर येथे ही माहिती दिल्याचा दावा मीडियापार्टने केला होता.

मात्र दसॉल्ट एव्हिएशनने हे मीडियापार्टचे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच आम्ही स्वायत्तपणे रिलायन्सची निवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. भारतातील संरक्षण खरेदीबाबतच्या नियमांचे पालन करण्यासाठी ५० टक्के ऑफसेट करार करणे बंधनकारक होते. त्यासाठी दसॉल्ट एव्हिएशनने एका संयुक्त कंपनीची (जॉईंट व्हेंचर) स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रिलायन्स ग्रुपची निवड करण्यात आली, तसेच १० फेब्रुवारी २०१७ रोजी दसॉ रिलायन्स एअरोस्पेस लिमिटेड (DRAL) या कंपनीची स्थापना करण्यात आली, असे स्पष्टीकरण दसॉ एव्हिएशनने दिले आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x