23 September 2021 4:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

Corona Virus: ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद: मनीष सिसोदीया

Deputy Chief minister Manish Sisodia, Corona Virus

नवी दिल्ली: मनीष सिसोदिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनीष सिसोदिया म्हणाले, “31 मार्चपर्यंत प्राथमिक शाळा बंद राहतील. यामध्ये पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व शाळा बंद राहतील. दिल्ली सरकारचा हा निर्णय उद्या म्हणजेच शुक्रवार, 6 मार्चपासून लागू होणार आहे. यामध्ये सरकारी, खाजगी, ऐडेड, एनडीएमसी या सर्व शाळांचा समावेश आहे. तसेच, आम्ही सर्व शाळांमध्ये कोरोना व्हायरससंबंधी सूचना दिल्या आहेत.”

BhagyaVivah Marathi Matrimonial

तत्पूर्वी इटलीतून आलेल्या काही पर्यटकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले असतानाच आता कोची येथे इटलीतून आलेल्या एका जहाजावरील ४५९ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ‘कोस्टा व्हिक्टोरिया’ असे या जहाजाचे नाव असून ते कोची बंदरात आले आहे. मंगळवारी त्यावरील सर्व प्रवाशांची ताप व इतर लक्षणांबाबत तपासणी करण्यात आली आहे. यातील ४५९ प्रवासी उतरले असून त्यातील ३०५ भारतीय आहेत. सर्व प्रवाशांची चाचणी करण्यात आल्याची माहिती कोची पोर्ट ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी जिजो थॉमस यांनी दिली.

दुसरीकडे, जगभरात कहर माजवलेल्या कोरोना विषाणूने भारतामध्येही शिरकाव केलाय. बुधवारी गुडगावमधील लोकप्रिय डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम कंपनीचा एक कर्मचारी कोराना बाधित असल्याची पुष्टी झाली. कंपनीने एका परिपत्रकाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याची कोराना टेस्ट पॉजिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. या प्रकारानंतर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी दिली असून त्यांना घरून काम करण्यास परवानगी दिली आहे.

 

News English Summery: Manish Sisodia interacted with the media. At this time Manish Sisodia said, “Primary schools will be closed till March 31. All schools from 1st to 5th will be closed. This decision of the Delhi government will take effect tomorrow, Friday, March 6th. This includes all government, private, aided and NDMC schools. Also, we have given Corona virus instructions in all schools.”

 

Web News Title: Story Corona virus prevent possibility spreading Delhi primary school will be closed till 31st March says Deputy Chief minister Manish Sisodia.

हॅशटॅग्स

#Delhi(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x