13 December 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

निर्भयाच्या गुन्हेगारांच्या फाशीची तारीख ठरली; चौथ्यांदा जारी केलं डेथ वॉरंट

NIrbhaya gang rape, convicts to be hanged

नवी दिल्ली : संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचं ठरलं आहे. कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केलं आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी कोर्टाची दारं ठोठावत राहिल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झालं होतं. तीन वेळा रद्द झाल्यानंतर आता चौथ्या वेळी कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. यावेळी दोषींची फाशी अटळ असल्याचं बोललं जात आहे.

त्यानंतर या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए पी सिंह यांनी, ‘दोषींची चार वेळा न्यायिक हत्या झालेली आहे. अजून किती वेळा दोषींची हत्या होणार?’ असा प्रश्न विचारत भावनिक साद घातली. ‘हा काही दहशतवादाचं प्रकरण नाही आणि दोषी तुरुंगात राहून सुधारणा करत होते’ असंही सिंह यांनी यावेळी म्हटलं. उल्लेखनीय म्हणजे, अद्यापही कायदेशीर पर्याय बाकी असल्याचा दावा दोषींचे वकील ए पी सिंह यांनी केलाय.

दिल्लीत २०१२ मध्ये मेडिकलला शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकूनही देण्यात आले. १६ डिसेंबर २०१२ ला घडलेल्या या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र २९ डिसेंबर २०१२ ला निर्भयाचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. २०१३ च्या मार्च महिन्यात सहापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. हायकोर्टाने २०१४ मध्ये या आरोपींची फाशी कायम ठेवली. तर मे २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टानेही ही फाशी कायम ठेवली.

 

News English Summery: The accused in the fearless gang-rape case that shook the entire country were finally set to be hanged at 5.30am on March 20. The court issued a fourth death warrant. Earlier, the death warrant was revoked as none of the culprits were sentenced to court after fixing the date and time of execution three times. Now, the court has issued a warrant for the fourth time after being canceled three times. It is said that the execution of the culprits is unavoidable. All the Nirbhaya criminals will be hanged together on March 20 in the morning. The execution date was earlier fixed for March 3. But a curative petition filed by Pawan Kumar Gupta, a convict, triggered the hearing and the execution was canceled. After the Supreme Court rejected Pawan’s plea, the President has also rejected his mercy petition. Pawan Kumar has adopted all legal alternatives till now and now it is said that his death sentence is unavoidable.

 

Web News Title: Story Nirbhaya Gang rape Case convicts to be hanged on March 20 Delhi Patiala court.

हॅशटॅग्स

#RapeCase(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x