25 July 2021 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

राजस्थानात न्यायालयाकडून भाजपाला मोठा धक्का, तर काँग्रेसला दिलासा

Rajasthan, High Court, Sachin Pilot, CM Ashok Gehlot

जयपूर, २७ जुलै : राजस्थान देशातील राजकीय घडामोडींचं हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला असून, अजूनही त्यावर पडदा पडलेला नाही. सचिन पायलट समर्थक आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असतानाच भाजपानेही बहुजन समाज पक्षाच्या आमदारांसंबंधात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राजस्थानातल्या बसपाच्या ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याविरोधात भाजप आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे कारवाईची मागणी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं याचिका रद्दबातल ठरवली.

न्यायालयानं भाजपाची ही याचिका फेटाळून लावली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपाचे सहा आमदार निवडून आले होते. या सहा आमदारांच्या गटानं अशोक गेहलोत यांच्या सरकारला पाठिंबा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याविरोधात भाजपानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

News English Summary: The BJP had also filed a petition against the Bahujan Samaj Party MLAs while the verdict on the petition filed by pro-Sachin Pilot MLAs was pending. However, the petition was rejected by the court.

News English Title: Rajasthan High Court Dismisses The Petition Filed By BJP News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x