12 December 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
x

गुजरात: CAA कायद्याला आणि मोदींना पाठिंबा देण्यासाठी शाळेची विद्यार्थ्यांना धमकी

CAA Support, Gujarat School

अहमदाबाद: सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींच अभिनंदन करणारं पत्र लिहिण्याची सूचना केल्यानं गुजरातमधील शाळा वादात सापडली आहे. याबद्दल पालकांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यानं शाळेनं माफी मागितली. या पत्रातला मायनादेखील शाळेतील शिक्षकांनी वर्गांमधल्या फळ्यावर लिहून दिला होता. हाच मजकूर पत्रात लिहिण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं हे वृत्त दिलं आहे.

पंतप्रधान मोदींना अभिनंदनपर पत्र न पाठवल्यास इंटर्नलचे गुण मिळणार नाहीत, असंदेखील विद्यार्थ्यांना शाळेकडून सांगण्यात आल्याचा दावा पालकांनी केला. ‘सर्व विद्यार्थ्यांना पत्र लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या. काहींनी यास नकार दिल्यावर इंटर्नलचे गुण दिले जाणार नाहीत, अशी धमकीच त्यांना देण्यात आली. या पत्रावर विद्यार्थ्यांना त्यांचा स्वत:चा पत्तादेखील लिहिण्यास सांगण्यात आलं. यामागचं नेमकं कारण काय? पालकांच्या परवानगीशिवाय शाळा मुलांना पत्र लिहिण्यास कसं काय सांगू शकते?’, असे प्रश्न एका पालकानं उपस्थित केले.

ही शाळा अहमदाबादमधली लिटिल स्टार शाळा असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. यानुसार, शाळेतल्या ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे पत्र लिहिण्यास बजावण्यात आलं होतं. या पत्रामध्ये आपण सीएए कायद्याला समर्थन करत असल्याचं नमूद करावं, असं देखील सांगण्यात आलं. तसेच असे पत्र न दिल्यास इंटर्नल परीक्षांचे गुण मिळणार नाहीत, असा दम देखील शाळेतल्या शिक्षकांनी दिला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी पत्र देखील लिहिली. मात्र, ही बाब पालकांच्या लक्षात येताच पालकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. हा प्रकार समोर आल्यानंतर लागलीच शाळा प्रशासनाने ही पत्र विद्यार्थ्यांकडून परत मागवली.

 

Web Title:  Gujarat school asked students write postcards congratulating Prime Minister Narendra Modi CAA Apologises later.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x