3 February 2023 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय? ISMT Share Price | 2200% परतावा देणारा 63 रुपयाचा हा शेअर दिग्गज गुंतवणूकदार खरेदी करत आहेत, स्टॉक डिटेल्स
x

पाकिस्तानी मंत्र्याच्या विरोधात भाजपच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्याने लहान मुलाचं लिंग धरुन ओढल्याचा घृणास्पद प्रकार

Maharashtra BJP

BJP Maharashtra Protest | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात भाजपने आज शनिवारी विविध जिल्ह्यात आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाकडून बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मार करून त्याचे दहण करण्यात आले भाजपकडून पुणे, नांदेड, जालना, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या ठिकाणी ही आंदोलन करण्यात आली.

खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या अंगावर आगीचा भडका उडाला
नांदेडमध्ये देखील बिलावल भुट्टोच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आंदोलन करत त्यांचा पुतळा जाळला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान बिलावल भुट्टोचा पुतळा जाळत असताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अंगावर आगीचा भडका उडाला. या आगीच्या भडक्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हाताला आग लागली होती. जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी ही आग तात्काळ विजवली. या घटनेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हाताचे चार बोट भाजले. खासदार चिखलीकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून खासदार चिखलीकर यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

जालना मध्ये भाजप कार्यकर्त्याचा विचित्र प्रकार :
जालना जिल्ह्यातल्या बदनापुरात आज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलना दरम्यान भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर एका लहान मुलाला लघुशंका करण्यासाठी आणण्यात आलं. मात्र त्यावेळी एका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं त्याचं लिंग धरुन ओढल्याचा प्रकार घडला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यानं केलेला या किळसवाणा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jalna BJP worker controversial action against child during protest while protesting against Billwar Bhutto statement check details on 17 December 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra BJP(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x