28 March 2024 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल? Reliance Share Price | होय! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पैसे दुप्पट करणार, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव प्रचंड महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील वाढीव दर तपासून घ्या Zomato Share Price | झोमॅटो शेअरने ब्रेकआऊट दिला, अल्पावधीत मोठी कमाई होणार, पुढील टार्गेट प्राइस जाणून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा 42 रुपयाचा शेअर! 1 वर्षात 2400% परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर?
x

येडियुरप्पा यांनी केली राजीनाम्याची घोषणा!

काही दिवसांपासून चाललेल्या कर्नाटकाच्या नाट्यमय सरकार स्थापनेचा अखेर शेवट झाला आहे. शेवट काहीसा अपेक्षित काहीसा अनपेक्षितच आहे. भाजपने कर्नाटकात चालवेलया पैशाच्या घोडेबाजाराला यश आलं नाही आणि त्यांना सत्तेवर पाणी सोडावा लागलं आहे. कर्नाटक विधानसभेमध्ये भावनिक भाषणानंतर येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

जनमतानुसार सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता मिळायला हवी होती पण काही ठिकाणी निसटत्या विजयामुळे आम्ही पूर्ण बहुमतात येऊ शकलो नाही. त्यांनी आपल्या भाषणात जनतेचे आभार देखील मानले.

आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही पण बहुमतासाठी मतदान करताना आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा आणि योग्य तो मतदानाचा निर्णय घ्यावा असे भावनिक आव्हान देखील त्यानी सर्व आमदारांना केले.

अडीच दिवसाचे मुख्यमंत्री राहून त्यांनी अखेर राजीनामा दिला आणि या संपूर्ण नाट्यमय घडामोडींवर पडदा पाडला आणि काँग्रेस – जेडीएसला सत्ता स्थापनेचे आव्हान केले. तरीही जर कर्नाटकात मध्यवर्ती निवडणूका लागल्या तर भाजप संपूर्ण बहुमताचे सरकार निवडून आणेल हा विश्वास व्यक्त केला.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x