12 August 2020 12:37 PM
अँप डाउनलोड

भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची घाई करायला नको होती - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी येडियुरप्पा यांच्या अडीच दिवसाच्या कार्यकाळावर आपले मत व्यक्त केले. त्यांच्या माते भाजपने सत्ता स्थापनेची घाई करायला नको होती, उलटअर्थी काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सय्यम ठेवला होता. त्यांच्यामते या पूर्ण नाट्यमय घडामोडींमध्ये कर्नाटकच्या राज्यपालांनी लोकशाहीला आघात देण्याचं काम केलं आणि त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा ठेवायला हवी होती असे मत व्यक्त केले.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

कर्नाटकामध्ये भाजपने सत्ता स्थापनेची घाई करायला नको होती अशी भावना सर्वच स्थरातून व्यक्त होत आहे. शेवटी बहुमत सिद्ध करण्याआधीच येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेस – जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी आव्हान केलं. परंतु जर भाजपने घाई केली नसती तर त्यांच्यावर आलेली हि नामुष्की टळली असती.

पुढील लोकसभा निवडणुकांसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि देशहिताचे काम केले पाहिजे असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x