23 September 2021 1:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

मुंबई जगातील 50 सर्वाधिक सुरक्षित शहरांत | मात्र 4 महिन्यांत महिलांवरील अत्याचारांत वाढ | इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट रिपोर्ट

Mumbai City

मुंबई , १२ सप्टेंबर | ऑगस्टमध्ये इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने मुंबईचा जगातील ५० सर्वाधिक सुरक्षित शहरांत समावेश केला. मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे चित्र वेगळीच कहाणी सांगते. मुंबईत ४ महिन्यांत महिलांवरील अपराध १३३% वाढले आहेत. वरिष्ठ वकील आभा सिंह म्हणाल्या, ‘मुंबई पोलिस आपली सर्व ऊर्जा सुशांतसिंह व राज कुंद्रा प्रकरणात लावत आहे. दिल्ली निर्भया प्रकरणानंतर मृत्युदंडाचा कायदा झाला. मात्र आजवर किती दोषींना फासावर लटकावले?

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुंबई जगातील 50 सर्वाधिक सुरक्षित शहरांत, मात्र 4 महिन्यांत महिलांवरील अत्याचारांत वाढ – Mumbai is among the 50 safest cities in the world but violence against women increased said report :

* महाराष्ट्रात महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या सर्वात जास्त घटना मुंबई शहर आणि परिसरात होतात.
* महाराष्ट्रात सन २०१७ मध्ये ३१९९७, २०१८ मध्ये ३५५०१ गुन्हे झाले. ते २०१९ मध्ये ४.५४% वाढून ३७,११२ वर गेले. यात ६% गुन्हे बलात्काराचे आहेत.
* महाराष्ट्रात २०१९ मध्ये कोर्टात दाखल झालेल्या एकूण प्रकरणांपैकी ९३.४७ टक्के प्रलंबित आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. तसेच मुंबईतील हॉटस्पॉट निश्चित करून गस्त वाढवण्यास सांगितले. साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून एक महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे, जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्यावे, जेणेकरून पुढे कुणी अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने याप्रकरणी विशेष सरकारी अभियोक्त्यांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी, असे स्पष्ट निर्देश शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

हॉटस्पॉट निश्चित करून नियमित गस्त वाढवावी:
* महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.
* प्रत्येक पोलिस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस-रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.
* स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.
* महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.
* गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्याची कार्यवाही लगेच सुरू करावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mumbai is among the 50 safest cities in the world but violence against women increased said report.

हॅशटॅग्स

#MumbaiCity(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x