25 April 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

Manish Gupta Murder | व्यवसायिक मनिष गुप्तांचा गोरखपूर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू | पत्नीचा आक्रोश

Kanpur Manish Gupta murder

कानपूर, ३० सप्टेंबर | गुरुग्रामहून २ मित्रांसोबत गोरखपूरला फिरण्यासाठी आलेले कानपूरच्या व्यवसायिक मनिष गुप्ता यांचा (Kanpur Manish Gupta Murder) पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. चौकशीचा विरोध करण्यावरुन पोलीस कर्मचाऱ्यांना मनिष गुप्ता यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मंगळवारी ४ वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन मनिषची पत्नी मिनाक्षी न्याय मागण्यासाठी पुढे आली आहे. पित्याच्या मृत्यूबाबत मुलाला काय सांगू? असा सवाल तिने केला आहे. तसेच, सरकारने देऊ केलेल्या 10 लाख रुपयांच्या मदतीवरही तिने प्रश्न उपस्थित केला आहे.

Kanpur Manish Gupta, a 36-year-old property dealer died in a Gorakhpur hotel during a police raid. He was staying along with two friends in the hotel. Police had earlier denied the charge and said he received a head injury after he fell on the ground as he was drunk :

मिनाक्षी यांनी पतीच्या निधनानंतर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. बिकारु हत्याकांडमध्ये जे पोलीस शहीद झाले त्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. पण, पोलिसांनी माझ्या निर्दोष पतीला ठार केले, तेव्हा 10 लाख रुपयांची मदत देतात. हा कुठला न्याय आहे. पोलीस शहीद झाल्यास 1 कोटी आणि पोलिसांनी ठार केल्यास 10 लाख?, असा प्रश्न मिनाक्षी यांनी विचारला आहे.

संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या मृत्यूच्या आक्रोश करत पोलीस दलावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. जर माझा मुलगा पोलीस बनणार असेल तर त्याला का बनायला सांगू? लोकांच्या रक्षणासाठी असणाऱ्या पोलिसांनीच माझ्या पतीचा जीव घेतला. लोकांना ठार करण हे पोलिसांचे काम आहे का? मिनाक्षीच्या या प्रश्नाची उत्तरं कुणाकडेच नाहीत. माझ्या नवऱ्याला मारहाण करण्यात आली. कुठल्या कायद्यातंर्गत पोलीस चेकिंगच्या बहाण्याने अर्ध्या रात्री खोलीत घुसले आणि मारहाण करत पतीचा जीव घेतला. या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करूनही न्याय मिळत नाही.

मिनाक्षीच्या पतीचा मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी घरच्यांना सांगितले. तेव्हा पहाटे ५ वाजता ते तिथे पोहचले. मृतदेह पाहताच किती बेदम मारहाण झालीय त्याचा अंदाज येऊ शकतो. शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसत होत्या. माझ्या पतीचा मृत्यू पडल्याने नाही तर मारहाणीत झालाय. मला न्याय हवाय असं मिनाक्षी सगळ्यांना ओरडून सांगत आहे. मनिषच्या घरी जेव्हा पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यांनी स्थानिक भाजपा नेत्यांना फोन करून माहिती दिली. जबरदस्तीने पोलीस कर्मचाऱ्यांनी मनिषला पोलीस स्टेशनला नेले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kanpur Manish Gupta murder case in CM Yogi Adityanath constituency Gorakhpur police station.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x