13 December 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Actress Soujanya Suicide | अभिनेत्री सौजन्याची सिलींग फॅनला लटकून आत्महत्या

Kannada actress Soujanya suicide

बंगळुरू, ३० सप्टेंबर | फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री सौजन्याने (Actress Soujanya Suicide) आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये बंगळुरूच्या घरातून सापडला. प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितले आहे की खोलीचा दरवाजा आतून बंद होता. जेव्हा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा अभिनेत्रीचा मृतदेह खोलीत फासाला लटकलेला होता. अभिनेत्री सौजन्याच्या पायांवर असलेल्या टॅटूच्या चिन्हांनी तिची ओळख पटली. खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली आहे.

In a tragic news in the world of showbiz, actress Soujanya died by suicide. According to reports, the actress hung herself to death in the confines of her apartment in Kumbalgodu in Bengaluru :

बंगळुरूच्या घरात एकटीच राहत होती सौजन्या:
अभिनेत्री सौजन्या बंगळुरू दक्षिण जिल्ह्यातील कुंबलगोडू येथील एका अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. सुसाईड नोटमध्ये अभिनेत्रीने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. अशा परिस्थितीत पोलीस आत्महत्येचा शोध घेत आहेत. सौजन्या ही मूळची कोडगु जिल्ह्यातील कुशालनगर येथील होते. अभिनेत्री सौजन्याने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याबद्दल तिच्या सुसाईड नोटमध्ये कुटुंबाची माफी मागितली आहे. ही सुसाईड नोट 27 सप्टेंबर रोजी लिहिली होती.

आजवर पाठिंबा दिलेल्यांचे सैजन्याने सुसाईड नोटमध्ये आभार मानले आहे:

Kannada-actress-Soujanya-suicide-Note

या चिठ्ठीमध्ये अभिनेत्री सौजन्याने नैराश्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पोलीस आता सौजन्याचे पालक आणि त्यांच्या मित्रांची चौकशी करत आहेत. पोलिसांना हे जाणून घ्यायचे आहे की अभिनेत्री सौजन्याने स्वतः ही गोष्ट केली आहे की यासाठी तिच्यावर दबाव होता? सौजन्याने सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की तिला कोणताही आजार नव्हता, पण ती मानसिक समस्यांनी ग्रस्त होती. चिठ्ठीत, तिने अशा काळात ज्यांनी त्यांना पाठिंबा दिला त्या सर्वांचे आभार मानले आहेत.

सौजन्याने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. ती अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांचाही भाग राहिली आहे. सौजन्याने ज्या लोकांसोबत काम केले आहे त्यांच्याकडून पोलीस काही धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बातमी कन्नड उद्योगासाठीही धक्कादायक आहे, कारण काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जयश्री रमैया हिनेही आत्महत्या केली होती. मानसिक आजार आणि संघर्ष हेही तिच्या आत्महत्येमागील कारण असल्याचे मानले जात होते. या वर्षाच्या सुरुवातीला, ‘बिग बॉस कन्नड’ फेम चैत्रा कुटूरनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Kannada actress Soujanya dies by suicide hangs herself to death.

हॅशटॅग्स

#SoujanyaSuicide(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x