14 April 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास बचत योजना, मिळेल 7.70 टक्के व्याज आणि मोठा परतावा मिळवा Force Gurkha | फोर्सची गोरखा SUV लाँचिंगसाठी सज्ज, थेट जिम्नी, थार सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार, फीचर्स जाणून घ्या SBI Amrit Kalash Scheme | SBI बँकेची खास FD योजना, मिळेल वार्षिक 7.60 टक्के व्याज, बचतीसाठी बँकेत लाईन KTM RC 200 | लोकप्रिय KTM मोटरसायकलवर 5 वर्षांची वॉरंटी, रोड साइड असिस्टन्स सर्व्हिस फ्री Mangal Rashi Parivartan | मंगळ राशीपरिवर्तनाने 'या' 4 राशींचे भाग्य चमकणार, तुमची नशीबवान राशी आहे का? SBI Mutual Fund | एसबीआयची प्रसिद्ध म्युच्युअल फंड योजना, दरमहा 5000 रुपयांची SIP देईल 49 लाख रुपये Royal Enfield | रॉयल एनफिल्ड प्रेमींसाठी खुशखबर! कंपनी 'या' 3 नवीन बाईक्स लाँच करणार, फीचर्स डिटेल्स जाणून घ्या
x

जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार

मुंबई : महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

दरम्यान, शिर्डी मधील भाषणादरम्यान मोदींनी उल्लेख केला होता की, जलयुक्त शिवार योजनेमुळे १६,००० गावांना पाणी मिळाले. पण, पंतप्रधानांचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे असा आरोप पत्रकार परिषदेत अजित पवारांनी केला. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत जलयुक्त शिवार योजना आणली. परंतु, ताशा प्रकारची कामे झाली असल्याचे काहीच दिसत नाही. जर असं असेल तर मग या योजनेचे ७,५०० कोटी रुपये गेले कुठे, असा थेट प्रश्न उपस्थित करून अप्रत्यक्ष पणे भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तसेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती आहे आणि ग्रामीण महाराष्ट्र होरपळून निघण्याची चिन्ह आहेत. राज्यात याआधी १९७२ दुष्काळाची भयंकर स्थिती ओढवली होती. परंतु सध्या त्यापेक्षा सुद्धा भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं. परंतु, राज्य सरकार अजूनही अधिकृत पणे दुष्काळ घोषित करत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ताबडतोब दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रुपये मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच ३३ टक्के वीजबील माफ केल्याचे राज्य सरकार सांगते. परंतु, महावितरण आज सुद्धा वीजबीलं पाठवतच आहे. सणांच्या दिवशी लोकांना अंधारात ठेवण्याचे काम फडणवीस सरकार करत आहे. त्यामुळे फडणवीस सरकारने भारनियमन ताबडतोब रद्द करावे, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x