23 November 2019 8:08 AM
अँप डाउनलोड

शिवसेनेला उत्तर भारतीयांची मतं आणि हफ्ते, दोन्ही हवे: संदीप देशपांडे

मुंबई : प्रभादेवी येथे काही शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांना जागेच्या वादावरून जबर मारहाण केली असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच प्रकरणात मनसेने सुद्धा टीका केली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उत्तर भारतीयांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवर अधिकृत प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणावर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेनेला उत्तर भारतीयांची मतं आणि हफ्ते असं दोन्ही हवं आहे. एकीकडे ‘उत्तर भारतीय के सन्मान मे शिवसेना मैदान में’ अशा घोषणा द्यायच्या आणि मग उत्तर भारतीयांना मारहाण करायची अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेनेकडून अंमलात येत आहे, असं संदीप देशपांडे प्रतिक्रिया देताना म्हणाले. दरम्यान, ओला-उबर या कॅब सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काहीच पावलं का उचलत नाही, असा प्रश्न सुद्धा संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.

तसेच भविष्यात ओला आणि उबर प्रमाणेच मनसेचे अॅप सुरु करण्याचा विचार आम्ही करतो आहोत अशीही माहिती संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांना दिली . मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर होते आणि आजच ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(756)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या