18 September 2021 10:39 PM
अँप डाउनलोड

मराठा क्रांती मोर्चा, औरंगाबादेत आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून औरंगाबादेत पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी काकासाहेब शिंदे या युवकाने नदीत उडी घेऊन निषेध नोंदवताना आपला जीव गमावला होता. काल म्हणजे मंगळवारी जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे वय वर्ष ५५ यांनी आंदोलनादरम्यान विषप्राशन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मराठा आरक्षणातील आंदोलक जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे हे औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील रहिवाशी असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काकासाहेब शिंदे यांच्यानंतर जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे हे दुसरे बळी ठरले ठरले असल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विष प्रश्न केल्यानंतर त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंदोलन प्राथमिक पातळीवर असतानाच दोन आंदोलकांचा बळी गेल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(220)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x