27 July 2021 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

उद्धव ठाकरेंची मुलाखत एक फुसका बार, भाजप विरोध म्हणजे ‘मंगळसूत्र वापरणार नाही, पण कुंकू ठेवणार’

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सामना मधील टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या मॅरेथॉन मुलाखतीत सर्वच प्रश्नांना त्यांच्या पक्षीय दृष्टीकोनातून उत्तर दिली आहेत, त्याला सर्वच थरातून उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की ,’सत्तेत राहून विरोधाची नौटंकी करणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा लोकसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी पुरता उघडा पडला आहे जो जनतेने अनिभवाला आहे. थेट नाणारपासून महाराष्ट्राच्या अनेक ज्वलंत समस्यांवर आवाज उठवणे शक्य असतानाही १८ खासदारांना गैरहजर ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:ची व महाराष्ट्रातील जनतेची शुद्ध फसवणूक केल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत राहून सातत्याने भाजपला विरोध करण्याचे काम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे करत असून त्याचे वर्तन म्हणजे ‘मंगळसूत्र वापरणार नाही, पण कुंकू ठेवणार’ असा प्रकार असल्याचा सणसणीत टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या त्या मॅरेथॉन मुलाखतीची समाज माध्यमांवर सुद्धा खिल्ली उडविली जात असून, नेटकऱ्यांनी शिवसनेच्या कार्यपद्धतीवर चांगलंच तोंडसुख घेतल्याचे निदर्शनास येत आहे.

सत्तेत सामील होऊन सुद्धा गेली ४ वर्ष सतत आमच्या मंत्र्यांना अधिकार नाही आणि आमदारांना निधी मिळत नाही, असे म्हणाऱ्यांनी ‘शिकारीसाठी आता बंदुकीची गरज नाही, सावज दमलेय’ असे म्हणणे हे हास्यास्पद आहे. तसेच नाणार आणि समृद्धी महामार्गासंबंधित विषयावर सुद्धा शिवसेनेची भूमिका ही दुपट्टी असल्याचा आरोप बाळा नांदगावकरांनी केला आहे. नांदगावकर म्हणाले की ,’एकीकडे समृद्धी महामार्गाला विरोध करायचा आणि दुसरीकडे यांचेच मंत्री एकनाथ शिंदे सरकारला सहकार्य करत आहेत. नाणारला असलेला विरोधही असाच नाटकी आहे. उद्योगमंत्र्यांनी जमीन खरेदीची अधिसूचना रद्द केल्याचे जाहीर केले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस त्याची अंमलबजावणीही करत नाही आणि केंद्र सरकार करारावर करार करत आहे. अशी भूमिका म्हणजे जनतेची आणि मतदाराची सुद्धा फसवणूक असल्याचा थेट आरोप त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(670)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x