28 June 2022 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
2022 Mahindra Scorpio-N | 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन लाँच | किंमत आणि काय खास आहे पहा Pre-Approved Loan | तुम्हालाही प्री-अप्रुव्हड लोनसाठी ऑफर कॉल, ई-मेल किंवा एसएमएस येतात का? | मग हे जाणून घ्या लेट करंट? | सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं त्याचा अर्थ उशिरा कळला? | शिंदे गटाचा मुक्काम 12 जुलैपर्यंत वाढला सुप्रीम कोर्टाने 11 तारखेपर्यंत स्टेटस खो दिला, निर्णय नव्हे | राज्यपालांना अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही | शिंदेंचा विजयाचा उतावळेपणा Horoscope Today | 28 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल शिंदे गट फ्लोअर टेस्टसाठी जाईल? | सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरू झाल्या तर थेट आमदार बरखास्तीची कारवाई सुरू होऊ शकते Hot Stocks | आज फक्त 1 दिवसात या शेअर्सनी तब्बल 40 टक्क्यांपर्यंत परतावा दिला | स्टॉक्सची यादी पहा
x

Maharashtra School Reopening GR | राज्यात 1 डिसेंबरपासूनच शाळा सुरु होणार | राज्य सरकारचा GR

Maharashtra School Reopening GR

मुंबई, 30 नोव्हेंबर | ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरु होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी (Maharashtra School Reopening GR) करण्यात आलाय.

Maharashtra School Reopening GR. New variant of the corona, Omicron, everyone was wondering when the schools in the state would start. But now it is clear that schools in the state will start from December 1 :

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग 1 डिसेंबपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे. तसेच शाळा सुरु करताना नेमकी कोणती खरबदारी घ्यावी, यासाठी राज्य सरकारने नियमावलीदेखील जारी केली आहे.

राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार :
सध्या ओमिक्रॉन या कोरोनच्या नव्या रुपाचा सर्वांनीच धसका घेतलाय. या विषाणूविरोधात लढण्यासाठी जगभरात वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. राज्य सरकारनेदेखील आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत. याआधी राज्य सरकारने राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार असे जाहीर केले होते. मात्र ओमिक्रॉन विषाणूमुळे शाळा उशिराने सुरु केल्या जाणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा 1 डिसेंबर रोजीच सुरु होणार आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra School Reopening GR on schools in the state will start from 1 December 2021.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x