सातारा : सातारा येथे मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना आक्रमक आंदोलकांनी घोषणा देत भाषण करण्यापासून रोखलं असं वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यात सुद्धा मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसत आहे.

साताऱ्यामध्ये मराठा समाजाने विराट मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चातील सहभागी हजारो आंदोलक खूपच आक्रमक दिसत होते आणि विशेष म्हणजे आमदारांना मोर्चात फक्त सहभागी होण्याच्या सूचना होत्या, परंतु भाषण करता येणार नाही अशी ठाम भूमिका कळविण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा मोर्चेकऱ्यांसोबत सहभागी झाले होते. हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच शिवेंद्रराजे भोसले मोर्चेकऱ्यांनी संबोधित करण्यासाठी पुढे सरसावताच आंदोलकांनी त्यांना घोषणा देत भाषण करण्यापासून रोखले. त्यानंतर या दोन्ही आमदारांनी तेथे अधिक वेळ थांबणे योग्य न वाटल्याने त्यांनी त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

Maratha Kranti Morcha protestant opposed NCP MLA Shivendraraje Bhosale from speech