3 July 2020 2:49 PM
अँप डाउनलोड

मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवणार: अमित शाह

Amit Shah, Devendra Fadnavis, Aaditya Thackeray, Shivsena, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला बहुमत मिळेल यात शंका नाही. पण भारतीय जनता पक्षाला स्वबळावरसुद्धा बहुमत मिळेल, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका खाजगी टीव्ही वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच असेल.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

महाराष्ट्रात सेनेबरोबर युती असली तरी मुख्यमंत्रिपद आमचंच असेल, असंही शहा यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय मात्र त्यांनी राज्याच्या नेत्यांवर सोपवला. देवेंद्र फडणवीस यांची टीम उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीसांवर एवढी मोठी जबाबदारी टाकताना त्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण याचेही संकेत दिले. आमचं ठरलंय, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं नेमकं काय ठरलं होतं, हे आता स्पष्ट होत आहे.

“युतीमध्ये अनेकदा कार्यकर्त्यांचा दबाव असतो. तर अनेकदा पक्षांना आपला विस्तार करायचा असतो. या गोष्टी अजिबात चुकीच्या नाहीत. लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढले होते आणि विजयी झाले होते. विधानसभेतही आम्ही एकत्र लढत आहोत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ,” असं शाह यावेळी युतीबद्दल बोलताना म्हणाले.

शिवसेनेनेही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा दावा केला आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, “या वक्तव्यामुळे युतीला कोणताही धोका आहे असं मी मानत नाही. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील,” ही बाब स्पष्ट आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)#Amit Shah(238)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x