18 November 2019 12:20 AM
अँप डाउनलोड

मनसे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

MNS, Raj Thackeray, Vidhansabha Election 2019, Assembly Election 2019, mns 2nd candidates list

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत एकूण ४८ उमेदवार असून अनेक नवोदितांना सुवर्ण संधी मिळाली आहे. त्यात शिवडी मतदार संघातून माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या ऐवजी संतोष नलावडे यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान डोंबिवली मधून मंदार हळबे, धुळे शहर – प्राची कुलकर्णी, नांदेड उत्तर – गंगाधर फुगारे, ऐरोली – निलेश बाणखेले, चांदिवली – सुमित भारस्कर, घाटकोपर पूर्व – सतिश नलावडे, शिवडी – संतोष नलावडे, औसा – शिवकुमार नगराळे, विलेपार्ले – जुईली शेेंडे यांच्यासह अनेकांना मनसेने तिकीट दिले आहे.

लवकरच उर्वरित यादी देखील जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे, कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर आहे आणि ५ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर ५ तारखेपासून राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका लागणार आहे.

हॅशटॅग्स

#RajThackeray(28)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या