7 August 2020 9:58 AM
अँप डाउनलोड

फर्जंद टीमने मानले मनसे व राज ठाकरेंचे आभार, महाराजांच्या चित्रपटाला प्राईम टाईम शोज व स्क्रिन्स

मुंबई : छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या वीर मावळ्यांचा पन्हाळगड किल्ला सर करण्याच्या पराक्रमावर आधारित ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाला अप्रतिम प्रतिसाद मिळत असताना सुद्धा, पुन्हां प्राईम टाईम शोज व स्क्रिन्सचा अडथळा निर्माण झाला होता.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मराठी रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना सुद्धा चित्रपटाला प्राईम टाईम शोज व स्क्रिन्स मिळत नसल्याने विषय अखेर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारी गेला होता.

अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्रमक पुढाकार घेऊन फर्जंद चित्रपटाला अधिक प्राईम टाईम शोज व स्क्रिन्स उपलब्ध करून दिल्यामुळे फर्जंद चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक दिली आहे. मनसेने केलेल्या मदतीमुळे ते शक्य झाल्याने फर्जंद चित्रपटाच्या संपूर्ण टीमने राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानले असून तसे लेखी पत्रक जाहीर केलं आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x