मुंबई : शाम मारोती गायकवाड या शिवसैनिक कार्यकर्त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं म्हणून चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा दिल्या. या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी भावनिक मागणी या तरुणाकडून करण्यात आली आहे. तासा भराने जेंव्हा त्याला अग्निक्षमण दलाच्या जवानांनी खाली उतरवले तेंव्हा त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही त्या ठिकाणी वाटली आहेत.
शाम गायकवाड हा शिवसेनेचा कार्यकर्ता या मुलाचा यवतमाळचा आहे. पण मुंबईत चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून तो घोषणा देत होता आणि पुलावरुन उडी मारण्याची धमकीही तो अग्निक्षमण दलाच्या जवानांना देत होता. जवळ जवळ तासभर श्याम गायकवाड या तरुणाने पुलावर ठाण मांडले होते.
अखेर तासाभराच्या ड्राम्यानंतर पोलीस आणि अग्निशमनदलाची गाडी आली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला मोठ्या शिडीद्वारे खाली उतरवलं. त्यांचवेळी त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी उपस्थितांना पत्रकेही वाटली आणि लगेचच त्याला स्थानिक माटुंगा पोलिसांनी अटक करत ताब्यात घेतलं.
आज जरी हा तरुण शिवसैनिक असला तरी २०१२ मध्ये याने भाजपच्या तिकिटावर मांडवा गणातून पंचायत समितीची निवडणूक लढली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली.
आंदोलन करणाऱ्या शाम गायकवाडच पत्र
